महास्वच्छता अभियानात १ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये १ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९३ वा रविवार असून या अभियानामध्ये स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर व कार्यकर्ते, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैदयकिय अधिकारी डॉ. विजय पाटील, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. हि मोहिम महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
     सदरची स्वच्छता सायबर चौक ते केएसबीपी गार्डन चौक, सीपीआर चौक ते तोरस्कर चौक, पंचगंगा घाट, स्मशानभूमी संपूर्ण परिसर, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ चौक, ताराराणी चौक ते शिरोली जकात नाका, डीएसपी ऑफिस ते लाईन बझार मेनरोड येथे करण्यात आली. यावेळी  स्वरा फाउंडेशनच्यावतीने पंचगंगा घाट परिसर येथे स्वच्छता करण्यात आली.
      यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखील पाडळकर, स्वरा फाउंडेशनचे उपाध्यक्ष पियुष हुलस्वार, डॉ. अविनाश शिंदे, आयुष शिंदे, फैजान देसाई, यश रुकदिकर, मुकुंद कांबळे, शेखर वडणगेकर, आरोग्य निरिक्षक निरिक्षक सुशांत कावडे, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, महेश भोसले, श्रीराज होळकर, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *