“बसाल्ट क्वीन” मोहिमेसाठी १२ मुली सज्ज ; मार्चमध्ये मोहिम


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्रातील मुलींचा गिर्यारोहणातील सहभाग वाढावा आणि त्यांनीसुद्धा पारंपरिक गिर्यारोहण करावे या हेतूने गणेश गीध यांनी ” बसाल्ट क्वीन” या मोहिमेची आखणी केली असून त्यासाठी १२ मुलींची निवड करण्यात आली असल्याचे समिट ॲडव्हेंचरचे विनोद कांबोज यांनी सांगितले. 
     “बसाल्ट क्वीन” मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या मुलींमध्ये सौम्या जोशी (वय१०), गिरीजा लांडे (वय११), काव्या बोरोलीकर (वय८) – पुणे येथील या तिघींसह , अरमान मुजावर (वय२०) तासगाव-सांगली, आद्या नायर (वय१६) मुंबई, तनया कोळी (वय१६) – नाशिक, साक्षी प्रभुणे (वय१६) – सातारा, तन्वी अहेर (वय१२) व श्रुती शिंदे (वय१७) लोणावळा, मायरा संकपाळ( वय१०) – ठाणे, निशा वाघमारे (वय१५) – खंडाळा आणि कोल्हापूरच्या खुशी कांबोज (वय१९)  यांचा समावेश आहे.
    विनोद कांबोज म्हणाले की, शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेच्या माध्यमातून ही गिर्यारोहण मोहिम होत आहे. “बसाल्ट क्वीन”साठी नऊ वर्षांपासून ते वीस वर्षांपर्यंतच्या १२ मुलींची निवड करण्यात आली. या सर्व मुली ४ ऑक्टोबरपासून पुणे येथे एकत्र आल्या आणि त्यांची क्लायबिंग प्रोजेक्टची सुरूवात झाली. गिर्यारोहण हे एकच लक्ष्य असलेल्या या सर्व मुली पुण्यात गुरुकुल पद्धतीनुसार एकत्र राहत असून गेले पाच महिने त्यांचा कसून सराव सुरू आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या “बसाल्ट क्वीन” मोहिमेसाठी त्या सज्ज आहेत.
     गणेश गीध आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा टीमने पाहिलेले स्वप्न आता साकार होण्याच्या मार्गावर आहे. मार्च महिन्यात सह्याद्रीतील विविध खडतर सुळके या मुलींच्याकडून सर केले  जातील आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली गिर्यारोहणात नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली जाईल. या सर्व मोहिमेची डॉक्युमेंटरी बनविण्याचे काम शिवम अहेर व कोपल गोयल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
     पत्रकार परिषदेला हिल रायडर्सचे प्रमोद पाटील यांच्यासह ह्रषीकेश केसरकर,गणेश गीध, रोहित वर्तक, शिवम अहेर, दीपक पवार, कोपल गोयल, नेहा मोरे आदी उपस्थित होते.

Search for:. cialis tadalafil Coronavirus in Saudi Arabia confirmed cases.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *