महास्वच्छता अभियानात दिड टन कचरा व प्लॅस्टिक गोळा


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरामध्ये रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये दिड टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. स्वच्छता मोहिमेचा ९१ वा रविवार आहे.
     या अभियानामध्ये उपआयुक्त निखील मोरे, सहा.आयुक्त संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर व कार्यकर्ते, स्वच्छतादूत अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एनएसएसचे आदित्य लातूकर व विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. हि मोहिम महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
    सदरची स्वच्छता शियेनाका मेनरोड, तांबट कमान संपूर्ण परिसर, संभाजीनगर बसस्टॅण्ड ते तलवार चौक, हॉकी स्टेडिअम ते भक्तीपूजानगर चौक, बिंदू चौक ते दसरा चौक, पंचगंगा घाट परिसर, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ परिसर येथे करण्यात आली.  
      स्वरा फौंडेशनच्यावतीने जयंती पम्पिंग स्टेशन येथे स्वछता करुन वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षप्रेमी संस्थेकडून टाकाळा, माळी कॉलनी येथील महापालिकेच्या उद्यानामध्ये स्वच्छता मोहिम करुन प्रजासत्ताक दिन दिवशी वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे काढण्यात आले.
     आजच्या स्वच्छता मोहिमेत ३ जेसीबी, ६ डंपर, २ आरसी गाडया, ३ औषध फवारणी व २ पाणी टँकरचा वापर करण्यात आला. तसेच सदरची मोहिम महापालिकेच्या १५० स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबविण्यात आली.
      यावेळी संभाजी मगदुम, सर्जेराव आळवेकर, कोंडीबा गावडे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागिय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखील पाडळकर, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार, आरोग्य निरिक्षक सुशांत कावडे, नंदकुमार पाटील, श्रीराज होळकर, सुशांत शेवाळे, मुनीर फरास, करण लाटवडे, शिवाजी शिंदे, आदी उपस्थित होते.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *