कोल्हापूर जिल्ह्यासाठी १९.२५ कोटी रुपये मंजूर: पालकमंत्री सतेज पाटील

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १९.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. या निधीतून रस्ते, गटर्स व लहान पुलांची कामे करण्यात येणार आहेत. यातून करण्यात येणाऱ्या कामामध्ये करवीर, गगनबावडा व पन्हाळा तालुक्यातील गावांचा समावेश आहे.
कळंबे तर्फ ठाणे इस्पुर्ली शेळेवाडी रस्ता सुधारणा करणे (५ कोटी), कोल्हापूर जिल्ह्यातील विजयदूर्ग तलेरा गगनबावडा कोल्हापूर पट्टणकोडोली हुपरी रेंदाळ जंगमवाडी राज्य हद्दीपर्यंतची सुधारणा करणे एमएसईबी ते सांगवडे फाटा (२ कोटी ५० लाख), कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कळंबे तर्फ ठाणे पाचगांव भारती विद्यापीठ कंदलगांव कोगील खुर्द सिध्दगीरी हॉस्पीटल, कोगील बुद्रुक रस्ता व बंदीस्त आरसीसी गटर्स बांधणे (१ कोटी २५ लाख), गगनबावडा तालुक्यातील निवडे वेसर्डे असंडोली कोदे, साळवण बाजारपेठ ते वेसर्डे रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण करणे (७५ लाख), गगनबावडा तालुक्यातील परखंदळे गोठे आकुर्डे गारीवडे, खेरीवडे ते जर्गी रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण करणे (९० लाख), पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ सुळे कोदवडे वेतवडे म्हासूर्ली, सुळे ते खामनेवाडी मजबुतीकरण व रुंदीकरण करणे (१ कोटी), गगनबावडा तालुक्यातील अणदुर, मांडुकली, मणदूर, वेतवडे, बालेवाडी तांदुळवाडी रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण करणे (१ कोटी), गगनबावडा तालुक्यातील शेणवडे अणदुर धुंदवडे लहान पूलाचे बांधकाम (६० लाख), गगनबावडा तालुक्यातील परखंदळे, गोठे, आकुर्डे, गारीवडे, धुंदवडे ते चौधरवाडी रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण करणे (४० लाख), पन्हाळा तालुक्यातील परखंदळे, गोठे, आकुर्डे, गारीवडे गगनबावडा रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण करणे (५० लाख), पन्हाळा तालुक्यातील परखंदळे, गोठे, आकुर्डे गारीवडे, गोठे ते आकुर्डे रस्ता मजबुतीकरण व रुंदीकरण करणे (८५ लाख), करवीर तालुक्यातील केर्ली, वाडी रत्नागिरी, गिरोली रस्ता सुधारणा करणे, (३ कोटी), करवीर तालुक्यातील केर्ली वाडी रत्नागिरी, गिरोली रस्ता रूंदीकरणासह सुधारणा करणे १ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

या सर्व विकासकामांची एकूण मंजूर कामे एकोणीस कोटी पंचवीस लाख असून या कामांना लवकरच सुरवात होऊन कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!