शहरामध्ये १९ कंन्टेनमेंन्ट झोन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शहरात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आजअखेर चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत १९ ठिकाणी कंन्टेनमेंन्ट झोन करण्यात आले आहे. याठिकाणी महापालिकेच्यावतीने बॅराकेटिंग लावून सदरची इमारत अथवा गल्ली सील करण्यात आलेली आहे.
     राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोल्हापूर शहरामध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरामध्ये आजअखेर १९ कंन्टेनमेंन्ट झोन तयार केले आहेत. यामध्ये विभागीय कार्यालय क्र.१ गांधी मैदान अंतर्गत ५ ठिकाणी कंन्टेनमेंन्ट झोन तयार केले आहे.  विभागीय कार्यालय क्र.२ छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत ६ ठिकाणी कंन्टेनमेंन्ट झोन तयार केले आहे. विभागीय कार्यालय क्र.३ राजारामपूरी अंतर्गत १ ठिकाणी कंन्टेनमेंन्ट झोन तयार केले आहे. व विभागीय कार्यालय क्र.४ छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत ७ ठिकाणी कंन्टेनमेंन्ट झोन तयार केले आहे. या सर्व ठिकाणी महापालिकेच्यावतीने बॅराकेटींग करुन याठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बोर्ड लावण्यात आलेले आहेत. या कंन्टेनमेंट झोनमधील नागरिकांनी बाहेर फिरु नये, महापालिकेने दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!