गोकुळ दूधाची एकादिवसात २० लाख २ हजार लिटर्स विक्री 

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
      कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) ने निर्भेळ आरोग्‍यदायी मलईदार आणि अस्‍सल चवीच्या उत्पदनाने ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला असून गोकुळच्या दुग्धजन्य पदार्था बरोबरच शुध्‍द व सकस दुधालही ग्राहकांनी पसंती दिली आहे. गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने एक दिवसाच्‍या दूध विक्रीचा नविन उच्‍चांक प्रस्‍तापित करतांना आज रमजान ईद व अक्षय्या तृतीयेच्‍या दिवशी गोकुळच्‍या इतिहासातील उच्‍चांकी अशी २० लाख २हजार २१लिटर्स इतकी दूध विक्री झालेली आहे.
      गतवर्षी  याचदिवशी १६ लाख ३८ हजार १८० लिटर्स इतकी दूध विक्री गोकुळने एका  दिवसात केलेली होती. गतवर्षीच्‍या तुलनेत गोकुळच्‍या विक्रीत जवळजवळ ३ लाख ६३ हजार ८४१ लिटर्सने वाढ झाली असल्याची माहिती संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी दिली.  ते म्हणाले कि, या विक्रीमध्ये दूध उत्पादक, दूध संस्‍था, ग्राहक, कर्मचारी, वितरक वाहतुक ठेकेदार यांचे योगदान मोलाचे आहे.  
       दरम्यान, उच्‍चांकी दूध विक्री झाल्याबद्दल गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने चेअरमन विश्‍वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेठे, शशिकांत पाटील – चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!