कोल्हापूर सराफ संघासाठी २३ उमेदवार पात्र; माघारीनंतर चित्र स्पष्ट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर सराफ व्यापारी संघासाठी आज पाच जणांनी माघार घेऊन एकूण २३ उमेदवार पात्र ठरले, अशी माहिती निवडणूक अधिकारी जवाहर गांधी यांनी दिली.
      सायंकाळी पाचपर्यंत माघारीची अंतिम मुदत होती. त्यामध्ये संचालक पदासाठी एकूण २३ उमेदवारी अर्ज आले होते, त्यातील पाच जणांनी माघार घेतली. अध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी एकाने माघार घेतली. उपाध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी तीनही उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले.
       दरम्यान, सराफ संघासाठी १० एप्रिलला संघाच्या चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये सकाळी ८ ते दुपारी २ मतदान होऊन ११ तारखेला सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू होईल व दुपारी ४:३० वाजता विशेष सर्वसाधारण सभेत निकाल जाहीर केला जाईल.
       यावेळी निवडणूक मंडळाचे बिपीन परमार, विजय वशीकर, कांतिलाल ओसवाल, सुरेश गायकवाड, उमेश जामसांडेकर, हेमंत पावसकर आदी सदस्य उपस्थित होते.  
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!