घोडावत विद्यापीठाच्या २३ विद्यार्थ्यांची ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस’ कंपनीमध्ये निवड


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठाच्या मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन,  इलेक्टिकल आणि एरोनॉटिकल इंजिनीरिंग विभागाच्या मिळून २३ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीमध्ये निवड झाली आहे.
     दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात.
     टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस एक प्रख्यात कंपनी असून जगभरात विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत.आय टी क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील इंजिनीरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
      या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू डॉ. एम. टी . तेलसंग, प्रभारी कुलसचिव डॉ. एन. के. पाटील, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
     या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. स्वप्निल हिरीकुडे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद जोशी व सर्व विभागाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे समन्वयक यांनी अथक परिश्रम घेतले.  
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *