संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या २३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनीमध्ये निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या २३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या कंपनीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलेकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक १.५ लाखाचे पॅकेज प्राप्त झाले आहे.
      नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विभागप्रमुख प्रा.पी.एम.पाटील, प्रा. एन. एस. पाटील व प्रा.आर. पी. धोंगडी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
      या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.आरिफ अत्तार, विभाग समन्वयक प्रा.आशिष पाटील, प्रा.आकाश घस्ते व प्रा.भगवान पाटील व टीम यांनी अथक परिश्रम घेतले.
——————————————————- Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!