पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह २३० रक्तदात्यांचे रक्तदान

Spread the love

• काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदान शिबीर
कोल्हापूर • प्रतिनिधी
      “मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा” असे आवाहन करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास २३०  रक्तदात्यांनी रक्तदान केले.
     गेल्या एक-दीड महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकाळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत होती. कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यामध्ये सध्या रक्तसाठा कमी आहे.भविष्यात कुठेही रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये यासाठी सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पालकमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत या  शिबिरासाठी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत पालकमंत्र्यांच्या सामाजिक उपक्रमाला पाठबळ दिले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वतः रक्तदान केले.
     डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, सीपीआर, राजर्षी शाहू ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात माजी महापौर निलोफर आजरकेर यांच्यासोबत स्वाती नलवडे, उज्वला चौगले, पद्मिनी माने, शिवांगी खोत या महिलांनीदेखील रक्तदान केले. सुरुवातीला उजळाईवाडी येथील राहुल मिनेकर आणि निशा मिनेकर या दाम्पत्याने रक्तदान केले. याबाबद्दल नामदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी विशेष कौतुक केले. आजच्या रक्तदान शिबीरासाठी नेटके नियोजन करत प्रथम प्रत्येक रक्तदात्याची लेखी नोंदणी करून रक्तदान करून घेतले जात होते. रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्याला नाम. सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
     यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
    यावेळी आमदार ऋतुराज पाटील, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, विद्याधर गुरबे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, प्रविण केसरकर, सचिन चव्हाण, संजय पवार वाईकर, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, रंगराव देवणे, जय पटकारे, दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, संजय मोहिते, दीपक थोरात, विनायक कारंडे, संध्या घोटणे, चंदा बेलेकर, लीला धुमाळ, हेमलता माने, सुलोचना नायकवडी, पूजा आरडे, विद्या घोरपडे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————– Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!