११नंतर दुकाने सुरु ठेवल्याबद्दल ३० हजाराचा दंड वसूल

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरामध्ये सकाळी ११नंतर दुकाने सुरु ठेवणाऱ्या २ बिअरबार, ५ हॉटेल व्यावसायिक व इलेक्ट्रीकचे गोडावून चालू ठेवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करुन ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे शहरामध्ये विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने ४९ नागरीक व व्यापाऱ्यांकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
      शहरामध्ये शासनाच्या आदेशानुसार सकाळी ११नंतर औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. बुधवारी (दि.२१)  मिरजकर तिकटी येथील रविराज बिअरबार, संभाजीनगर येथील इंदिरासागर बिअरबार यांना प्रत्येकी ५ हजार रुपये तर पितळी गणपती येथील ३ हॉटेलवर प्रत्येकी १ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. त्याचप्रमाणे पद्मा टॉकीजजवळील आर. के. लाईट हाऊस यांनी गोडावून चालू ठेवून गोडावूनमधून इलेक्ट्रीक माल विकल्याबद्दल त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.   
      कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून १४९ लोकांकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल बुधवारी  महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क १४९ लोकांकडून ७०००, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने ३ नागरीकांकडून ३००० असे एकूण ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
      शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!