कोल्हापूर, सांगलीतील ४४ गावे वीजबिल थकबाकीमुक्त !

Spread the love

• गडहिंग्लज विभागाची अव्वल कामगिरी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     मार्चअखेर महावितरणच्या थकबाकी वसूली मोहिमेस वीज ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४४ गावे वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त झाली आहेत. कोल्हापूरच्या गडहिंग्लज विभागात सर्वाधिक ३६ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विभागात ७ गावांचा समावेश असलेले मांगले हे पहिले थकबाकीमुक्त शाखा कार्यालय ठरले आहे. महावितरणने ग्राहकांशी समन्वय साधून ही कामगीरी साधली आहे.
          गडहिंग्लज विभागाची अव्वल कामगिरी…..  
     कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील चिमणे, झुलपेवाडी, करपेवाडी, हालेवाडी, होन्याळी, बेलेवाडी, महागोंडवाडी, चव्हाणवाडी, पेंढारवाडी, कागिनवाडी, हंदेवाडी, दर्डेवाडी, माद्याळ, मेढेवाडी ही १४ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत. चंदगड तालुक्यातील शेवाळे, खामदळे, शिरोली, सत्तेवाडी, मोरेवाडी, मलगेवाडी, विंझणे, बोंजूर्डी, अलबादेवी, उत्साळी, महिपाळगड, मुरकुटेवाडी ही १२ गावे तर गडहिंग्लज तालुक्यातील हासूर सासगिरी, वैरागवाडी, सावंतवाडी, जांभुळवाडी, हेळेवाडी, लिंगनूर, दुगूनवाडी, तारेवाडी, चंदनकुड, उंबरवाडी ही १० गावे थकबाकीमुक्त झाली आहेत. या गावातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील १७६९ ग्राहकांनी २० लक्ष १७ हजार रूपये थकबाकी भरणा केली आहे. गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता दयानंद कमतगी (आजरा), विशाल लोधी (चंदगड), संदिप दंडवते (नेसरी), सागर दांगट (गडहिंग्लज) यांनी कामकाज पाहिले.
      कदमवाडी उपविभागातील  आंबेवाडी शाखेतंर्गतचे निटवडे (ता. करवीर) या गावातील १२० ग्राहकांनी ५ लक्ष रूपयांचा भरणा केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी गावाचे सरपंच तुकाराम व्हरांबळे यांचे आभार व्यक्त केले आहेत. जनमित्र सतीश भवड, अभिजित चोपडे, संदीप पाटील, विशाल फडतारे यांचा सत्कार केला. उपविभागीय अभियंता विक्रांत सपाटे, शाखा अभियंता मंदार भणगे यांनी ग्राहकांना थकबाकीचा भरणा करण्यासाठी प्रवृत्त केले.
      महावितरणच्या इस्लामपूर विभागातील शिराळा उपविभागांतर्गत असलेल्या मांगले (ता. शिराळा) शाखा कार्यालयाने कार्यक्षेत्रातील मांगलेसह देववाडी, लादेवाडी, फकीरवाडी, चिखलवाडी, चिमटेवाडी व पवारवाडी या ७ गावातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक १५८४ ग्राहकांनी ५६ लक्ष ७९ हजार रूपयांचा वीजबिल भरणा केला आहे. कार्यकारी अभियंता संतोष कारंडे व उपविभागीय अभियंता प्रल्हाद बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता स्वप्नजा गोंदील, जनमित्र राजेंद्र माने, क्षिरसागर गजबे आदींनी परिश्रम घेतले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!