चौथी शिक्षण परिषद उत्साहात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समितीच्या राजर्षी शाहू विद्यालय सीआरसी क्रमांक ७,कसबा बावडामध्ये   चौथी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली.
     राजर्षी शाहू विद्यालय कसबा बावडा कोल्हापूर सीआरसी क्रमांक ७ अंतर्गत चौथी शिक्षण परिषद डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या सभागृहांमध्ये उत्साहात पार पडली. कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिर व हायस्कूलच्या मुख्याध्यापकानी शिक्षण परिषदेचे यशस्वी नियोजन केले.
     केंद्र मुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असताना त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून शिक्षकांनी देशाच्या विकासासाठी खंबीरपणे व सक्षम असा विद्यार्थी तयार केले तरच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे भारत एकविसाव्या शतकातील जगातील एक महान देश बनेल असे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण सर्वजण कटीबद्ध आहोत. ते आपले परम कर्तव्य आहे.  
      कोरोनाकालीन शाळा व समाज यांच्यातील वातावरण चिंताजनक होत आहे. त्याचा परिणाम  विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार नाही, याची दक्षता सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास हा ऑनलाइन, ऑफलाईन, मिसकॉल द्या रेडिओ, स्वाध्याय उपक्रम, शनिवारच्या गोष्टी, पीडीएफ अभ्यासक्रम यासारख्या मीडियाचा वापर करून सोशल डिस्टन्स, मास्क व आरोग्य सांभाळून पालकांनी घरी अभ्यास पूर्ण करून घ्यावा. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी असा, मौलिक संदेश दिला.
     मुख्याध्यापिका सौ. छाया हिरुगडे,  गौतमी पाटील व डॉ. अजितकुमार पाटील यांनी उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बजावणार्‍या व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे गुलाबपुष्प व महिलांसाठी योगासन पुस्तक देऊन अभिनंदन केले. शिक्षण परिषदेमध्ये  सुखदेव सुतार यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले.
     प्रारंभी बाल्यावस्थेतील निगा आणि प्रशिक्षण आर. ए. रावराणे, जयश्री सावंत यांनी शालेय नेतृत्व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि शालेय नेतृत्व या विषयावर गोरख वातकर, सुप्रिया पाटील यांनी शाळा समूह आणि स्थानिक प्रशासन, माहिती तंत्रज्ञान आणि नेतृत्व याविषयी पाटील यांनी सुरेंद्र बडद यानी व्यावसायिक शिक्षण,  अमित परीट व सौ विद्या पाटील यांनी सर्व समावेशित शिक्षण व शिक्षणाचे सार्वत्रिकरण या विषयावर मार्गदर्शन केले. यूआरसीचे विषयतज्ञ श्रावण कोकितकर  यांनी परिषदेला भेट देऊन nep २०२० याविषयी मार्गदर्शन केले. 
     परिषदेसाठी श्री. कांबळे, श्री. चौगले, रामराजे सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले. सौ. गौतमी पाटील यांनी उपस्थित मुखाद्यापक, शिक्षक यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!