३० जूनपूर्वी घरफाळा भरल्यास ६ टक्के सवलत

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी   
      महानगरपालिका शहर हद्दीमधील मालमत्ता कराची २०२१-२२ या सालाकरीता देय असणारी घरफाळा बील महानगरपालिकेकडून तयार करण्यात आली आहेत. सर्वांची बिले महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या यापूर्वीच्या मंजूर केलेल्या धोरणानुसार दि. ३० जून २०२१अखेर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये ६ टक्के सवलत प्रचलित धोरणानुसार देण्यात आली आहे.
       महानगरपालिका ही कोल्हापूर शहराची प्रतिनिधीत्व करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कोविड-१९ अंतर्गत कोल्हापूर शहरामध्ये कराव्या लागणाऱ्या उपाययोजना करण्यामध्ये महानगरपालिका पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. सद्या महानगरपालिकेची वसूली कमी असल्याने विविध कामगिरी करण्यावर आर्थिक उपलब्धतेमुळे महापालिकेस अडचणी येत आहेत. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी चालू आर्थिक वर्षाची देयके तात्काळ तयार करून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे घरफाळा विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांनी युध्द पातळीवर काम करून सर्व मिळकतीचे देयके तयार करून संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहेत.
      तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी http://kolhapurcorporation.gov.in:8080/kmcop/Mi/CitizenLogin.aspx या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अथवा महानगरपालिकेच्या पाचही नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत आपल्या कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे.
     ऑनलाईन भरणा करताना कांही अडचणी असलेस महापालिकेच्या डेटा सेंटर (फोन नंबर ०२३१-२५४०९८८) वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे या अनुषंगाने कांही तक्रार अथवा माहिती आवश्यक असल्यास संबंधीत वॉर्ड ऑफिसमध्ये अथवा  propertytax@kolhapurcorporation.gov.in या  e-mail वर आपल्या  Whatsapp नंबरसह तक्रार नोंद करावी, असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
———————————————–

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!