गडहिंग्लज व राधानगरी तालुक्यातील कामांकरीता साडेसात कोटी मंजूर


कोल्हापूर • प्रतिनिधी
      केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील तिसऱ्या टप्याअंतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गडहिंग्लज व राधानगरी तालुक्यातील एकूण चार कामांकरीता ७ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली. 
      यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक म्हणाले, पंतप्रधान ग्रामसडक योजना ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून ही योजना राज्यात सन २००० पासून राबविण्यात येत आहे. सध्या या योजनेचा तिसरा टप्पा कार्यान्वीत असून यापैकी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी – तनवाडी – हणमंतवाडी – चिंचेवाडी रस्त्याकरीता १ कोटी ३५ लाख, प्रजिमा ५६ जरळी ते शिंदेवाडी – खमलेहत्ती – भडगांव प्रजिमा ५७ रस्त्याकरीता १ कोटी ८९ लाख, रा.मा. २०१ – नरेवाडी ते माणवाड – तेरणी रस्त्याकरीता २ कोटी ५२ लाख रु. असे गडहिंग्लज तालुक्याकरीता तीन कामांकरीता एकूण ५ कोटी ७६ लाख रु. तर राधानगरी तालुक्यातील घोटवडे – राशिवडे (करवीर तालुका हद्द) या एका रस्त्याकरीता १ कोटी ७६ लाख रु. मंजूर झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *