महावितरणच्या इचलकरंजी विभागाची ७७ कोटी ४७ लक्ष रूपयांची थकबाकी

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. त्यात कोल्हापूर मंडळातील इचलकरंजी विभागात ७७ कोटी ४७ लक्ष रूपयांची वीज बिल थकबाकी झाली आहे.
      कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी इचलकरंजी विभागाची बैठक घेतली. वीज बिलाची वसुली ठप्प झाल्याने महावितरणचा दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. तेंव्हा वीज बिलाची वसुली प्राधान्याने पुर्ण करण्याचे आदेश श्री. कावळे यांनी संबंधितांना बैठकीत दिले. या बैठकीस कार्यकारी अभियंता (प्र.) नीरज आहुजा यांच्यासह उपविभागीय अभियंता व शाखास्तरावरील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
      कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ६५० कोटीहून अधिक वीज बिल थकबाकी झाली आहे. कोल्हापूर मंडळातील इचलकरंजी विभागात सद्यस्थितीत ६४ हजार १२७ वीज ग्राहकांकडे सर्वाधिक ७७ कोटी ४७ लक्ष रूपये थकले आहेत. त्यात घरगुती ४७ हजार ५८५ ग्राहकांकडे २० कोटी ४९ लक्ष रूपये, वाणिज्य ६ हजार २२६ ग्राहक – ४ कोटी ६२ लक्ष रूपये , औद्योगिक ९ हजार २३३ ग्राहक – ४५ कोटी ९७ लक्ष रूपये , पथदिवे २४१ ग्राहक – ४ कोटी ६ लक्ष रूपये , पाणीपुरवठा ५०९ ग्राहक- १ कोटी ९० लक्ष रूपये, सार्वजनिक सेवा २५९ ग्राहक -३० लक्ष  रूपये वीज बिलाची थकबाकी झाली आहे. 
     या वीज बिल थकबाकीच्या पार्श्वभूमिवर झालेल्या आढावा बैठकीदरम्यान मुख्य अभियंता श्री. कावळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. त्यांनी या संवादातून वीजबिल वसुलीची कार्यपध्दती व उद्दिष्ट स्पष्ट करून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले. वीजग्राहकांनी थकीत व चालू वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
———————————————– ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!