कागल तालुक्यातील ९० टक्के मते सतेज पाटील यांच्या पाठीशी

Spread the love

• मंत्री मुश्रीफ, खा.मंडलिक व संजय घाटगे यांचा एकोपा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कागल तालुक्यात विधान परिषदेची एकूण ४९ मते आहेत. त्यापैकी ४३ मते सतेज पाटील यांच्या पारड्यात आहेत. त्यामुळे एकूण मतांच्या ९० टक्के मते गृहराज्यमंत्री श्री. पाटील यांना मिळणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे या नेत्यांचा एकोपा घडून आला आहे. या निवडणुकीत मंत्री श्री. पाटील यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास या तिन्हीही नेत्यांनी कागलमधील बैठकीत व्यक्त केला.
      कागल तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे सर्व म्हणजेच पाचही सदस्य महाविकास आघाडीचे आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद ही महाविकास आघाडीकडेच आहे. कागल शहरातील २३ पैकी १७ नगरसेवक महाविकास आघाडीचे आहेत. मुरगुडमध्ये सर्व म्हणजेच २० नगरसेवक महाविकास आघाडीचे आहेत.
      ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,आशा निवडणुकांमधून ज्या-ज्यावेळी कागल तालुका एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे ठाम उभा राहिलेला आहे. त्या त्या वेळी विजयाची माळ उमेदवाराच्या गळ्यातच पडलेली आहे.
     खासदार संजय मंडलिक म्हणाले, कागल तालुक्यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे आम्ही सर्वजण एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम झाली आहे.
     माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले महाविकास आघाडीचे विधानपरिषदेचे उमेदवार म्हणून पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी आम्ही एकदिलाने खंबीरपणे उभे आहोत.
     कागलमध्ये झालेल्या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय  घाटगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर आदींसह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.
      मुरगूड येथेही बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, सुखदेव येरुडकर, दिगंबर परीट रणजीत सुर्यवंशी आदी प्रमुखांसह नगराध्यक्ष राजेखान जमादर, उपनगराध्यक्ष रंजना मंडलिक, पक्षप्रतोद संदीप कलकुटकी,  नगरसेवक नामदेव मेंडके,  नगरसेवक जयसिंग भोसले,  नगरसेवक धनाजी गोधडे,  नगरसेविका सुप्रिया भाट,  नगरसेविका प्रतिभा सूर्यवंशी, नगरसेवक विशाल सूर्यवंशी, नगरसेविका हेमलता लोकरे, नगरसेवक रविराज परिट, नगरसेवक राहुल वंडकर, नगरसेविका संगीता चौगुले, नगरसेविका वर्षाराणी मेंडके, नगरसेविका रेखा मांगले, नगरसेवक मारुती कांबळे, नगरसेविका रुपाली सनगर, नगरसेविका अनुराधा राऊत, नगरसेवक बाजीराव गोधडे, नगरसेवक सुहास खराडे हे नगरसेवक उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!