शहरामध्ये ९०८२९ पहिल्या डोसचे व १०६३५ दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण

• ४५ वर्षावरील ४० टक्के नागरिकांचे लसीकरण
कोल्हापूर • प्रतिनिधी
      शहरामध्ये आजअखेर ९०८२९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स व नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण व १०६३५ दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ४५ वर्षावरील ४० टक्के शहरातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
     शासनाच्या आदेशाप्रमाणे कोविड-१९ लसीकरण मोहिम दि.१६ जानेवारी २०२१ पासून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सना पहिल्या टप्प्याध्ये लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यामध्ये ६० वर्षावरील सर्व नागरीक तसेच ४५ ते ५९ वर्षातील व्याधीग्रस्त नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक १ एप्रिलपासून कोल्हापूर शहरामध्ये ४५ वर्षावरील वयोगटातील नागरीकांना कोविड-१९ लसीकरण सुरु करण्यात आले आहे. महापालिकेस शासनाकडून आजअखेर ८८७०० इतक्या कोविड-१९ डोसेसचा पुरवठा झाला होता. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करुन आजअखेर ९०८२९ इतक्या पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर १०६३५ इतक्या पात्र लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
     सध्या कोविड-१९ चा उपलब्ध लस साठा पाहता दि.१६ एप्रिल २०२१ रोजी लस उपलब्ध होईपर्यंत महानगरपालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचे लसीकरण बंद राहणार आहे. शहरामध्ये सीपीआर हॉस्पिटल या ठिकाणी लसीकरण सुरु राहणार आहे. तसेच याव्यतिरिक्त मान्यताप्राप्त खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ लस उपलब्ध असून रु.२५०/- इतके नाममात्र शुल्क आकारुन कोविड-१९ लसीकरण करुन घेता येईल.
      यामध्ये कोल्हापूर इंस्टिटयुट ऑफ आर्थोपेडिक व ट्रोमा, ॲपल हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, जोशी हॉस्पिटल व डायलेसिस सेंटर, ओमसाई अँकोलॉजी हॉस्पिटल, सनराईज हॉस्पिटल, सिध्दीविनायक नर्सिंग हॉस्पिटल, ॲस्टर आधार हॉस्पिटल, मेट्रो मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, दत्तसाई हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, गंगाप्रकाश हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी कोविड-१९ लसीकरण सुरु राहणार आहे. सर्व नागरीकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *