मंत्री अब्दुल सत्तार यांनी हनुमानाबद्दल केलेल्या विधानाबद्दल पोलिसांत तक्रार

Spread the love

• हिंदुत्ववादी संघटनांची जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार
कोल्हापूर • प्रतिनिधी
      हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामभक्त पवनपुत्र हनुमानाबद्दल अत्यंत गलिच्छ शब्द वापरुन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल गणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. यावेळी ॲड. सुधीर जोशी,
अनिरुद्ध कोल्हापुरे, महेश उरसाल, अशोक रामचंदानी, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, अजित ठाणेकर, सचिन तोडकर, डॉ. संतोष निंबाळकर, ॲड. केदार मुनीश्वर, सुजित जोशी, अमित कांबळे, कपिल कदम, अमोल माने, सुरज चव्हाण, अनिकेत कुलकर्णी, पराग फडणीस आदी उपस्थित होते.
      जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल गणी (रा. सिल्लोड, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद) यांनी भगवान श्री हनुमानाबद्दल अपशब्द उद्गारले आहेत. त्यामुळे आम्ही फिर्याद देणार त्याचप्रमाणे जगातील अन्य भागांमध्ये राहणारे सर्व हिंदू यांच्या भावना दुखावलेले आहेत. अब्दुल सत्तार अब्दुल गणी यांच्या वक्तव्यामुळे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. त्यामुळे सदर अब्दुल सत्तार अब्दुल गणी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याबाबत सखोल तपास होऊन अब्दुल सत्तार अब्दुल गणी यांना कायद्याप्रमाणे कडक शिक्षा करण्यात यावी.
——————————————————- Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!