कोल्हापूर • प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करुन ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत शुक्रवारी मंगळवार पेठ, बागल चौक येथील सुप्रिम टेंपो हाऊस, ज्योतिर्लींग आटो पार्ट, लाईफवूड हार्डवेअर, अजय ट्रेडर्स, अर्दाळकर फ्रूट मर्चंट, शैलेश करपे यांच्यावर प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करुन दंड वसूल केला.
सदरची कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे, उप-आयुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर, निखील पाडळकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, श्रीराज होळकर, ऋषिकेश सरनाईक, दिलीप पाटणकर व कर्मचारी यांनी केली.