कागलमध्ये भाऊबीजेचा हृदयस्पर्शी सोहळा

Spread the love

•नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनचे आयोजन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कागलमध्ये ऋदयस्पर्शी भाऊबीज सोहळा संपन्न झाला. अतिशय भावनिक अशा या सोहळ्यात कोरोना काळात सौभाग्य गमावलेल्या साडेआठशेहून अधिक बहिणींनी आपला लाडका भाऊ हसन मुश्रीफ यांचे औक्षण केले. नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शूर महाराणी ताराराणी यांच्याप्रमाणे लढाऊ बाण्याने जिद्दीने लढा, अशी ऊर्जाही त्यांनी उपस्थित माता-भगिनींना दिली.
     यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, तुमच्यावर कसलेही संकट आले तर तुमच्या भावाला फक्त एक हाक द्या.  हरऐक परिस्थितीत तुमचा हा भाऊ तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे. तुम्ही एकाकी नाही.
      मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीने सौभाग्य गमावलेल्या बहिणींसाठी ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – उमेदने वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा या नावाने नवी योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत अशा माता भगिनींनी स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानजनक उपजीविकेसाठी रोजगार, स्वयंरोजगार व व्यवसायासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण, बचत गटांसाठी बिनव्याजी कर्ज व अनुदान तसेच व्यवसायासाठीही निधी दिला जाणार आहे. 
                          तर थेट मला फोन करा…. 
     कोरोना महामारीमुळे सौभाग्य गमावलेल्या माझ्या हजारो बहिणींची ही पहिली दिवाळी आहे. त्यांना धीर द्यावा या भावनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनाथ मुलांसाठी पाच लाख देण्याचे धोरण सरकारने ठरवले आहे. कुटुंबप्रमुख पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर वारसाहक्काने तातडीने त्याच्या पत्नीचे नाव घराच्या मालकी हक्कामध्ये लावायचे, त्याच्या शेतीची मालकी त्याच्या पत्नीच्या नावावर करायची, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ वृद्धापकाळ या सारख्या योजनांचा लाभ तातडीने द्यावयाचा तसेच घरकुलासह जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, या सर्व कामांत संदर्भात सरकारी अधिकारी, कर्मचारी ऐकत नसेल तर थेट मला फोन करा असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले.
     यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, सौ. नबीला अबीद मुश्रीफ, सौ. अमरीन नवीद मुश्रीफ, सौ.वृषाली पाटील, नगरसेविका सौ.मंगल गुरव, सौ. रहीमा मकानदार, सौ. पद्मजा भालबर यांनी मनोगते व्यक्त केली.
     यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, पी. बी. घाटगे, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी नगराध्यक्षा आशाकाकी माने, सौ. सबिना साजिद मुश्रीफ, रमेश तोडकर, शशिकांत खोत, सौ. शिल्पा खोत, सौ. अर्चना पाटील, अंजना सुतार, विकास पाटील, सौ. संगीता गाडेकर, सौ. शर्मिली मालणकर, सौ. नम्रता भांदिगरे, सौ. उषा सातवेकर, संजय चितारी, सौ. राजश्री माने, नितिन दिंडे, सौ. माधवी मोरबाळे, नगरसेविका अलका मर्दाने, सौ. शोभा लाड, सतिश घाडगे, सौ. नुतन गाडेकर, सौ. रुपाली परिट, हरुण सय्यद, प्रकाश नाळे, रविंद्र पाटील, रंगराव पाटील, नेताजी मोरे, राजेंद्र माने, बळवंत माने, रियाज जमादार, उदय परिट, महेश सलवादे, दत्तात्रय पाटील, किसन मेटील, सौ. आशाकाकी जगदाळे, सौ. रंजना सणगर, सौ. सुषमा पाटील,  सौ. वर्षा बन्ने, सौ. उज्वला कुंभार, सौ. शोभा चौगुले, शैनाज आत्तार, सौ. रंजना स्वामी, जयश्री सोनुले, बच्चन कांबळे व इतर उपस्थित होते.
     स्वागत कागल तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील यांनी केले. जिल्हाध्यक्षा सौ. शीतल फराकटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विवेक गवळी व विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. शैलजा पाटील- गिजवणेकर यांनी मानले.
——————————————————- Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!