कै.आण्णा मोगणे सहारा स्पोर्टसने कॅ.दिपक शिंदे ट्रॉफी पटकावली

• ओमकार मोहितेची अष्टपैलू कामगिरी
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजीत कै. कॅ. दिपक शिंदे अ गट क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात कै.आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् अॅकॅडमी अ संघाने फायटर्स स्पोटर्स क्लबवर ६४ धावानी विजय मिळवत कै. कॅ. दिपक शिंदे अ गट ट्रॉफी पटकावली.
     राजाराम कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलदांजी करताना कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् अॅकॅडमी अ ने ३७.१ षटकांत २४४ धावा केल्या. यामध्ये ओमकार मोहिते ६६, भरत पुरोहित ५०, प्रथमेश पाटील २३, राजवर्धन पाटील १२, स्मित पाटील ११ व अल्केश कवाळे  नाबाद १० धावा केल्या. फायटर्स स्पोर्टस क्लबकडून मंथन पाटीलने ३, निखिल कदम व प्रशांत कोरे यांनी प्रत्येकी २, अर्षद पठाण व उत्तम तंनगे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
    उत्तरादाखल खेळताना फायटर्स स्पोर्टस क्लबने ३३ षटकांत सर्वबाद १८० धावा केल्या. यामध्ये निखिल कदम ४४, उत्तम तंनगे व प्रशांत कोरे प्रत्येकी ३७, आदित्य शिंदे २१, आकाश गाडेकर १५ व मंथन पाटील १४ धावा केल्या. कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् अॅकॅडमीकडून ओंकार मोहितेने ३, भरत पुरोहित व श्रीराज चव्हाण यांनी प्रत्येकी २, स्मित पाटील, राजवर्धन पाटील व अल्केश कवाळे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
    कै. आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्  अॅकॅडमीच्या ओमकार मोहितेने ६६ धावा केल्या व ३ बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
     स्पर्धेचा बक्षिस समारंभ राजाराम कॉलेजचे प्राचार्य आण्णासाहेब खेमनर  व केडीसीएचे माजी अध्यक्ष आर. ए.(बाळ) पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्राध्यापक संजय पठारे, केडीसीए अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सेक्रेटरी केदार गयावळ, खजानिस अभिजीत भोसले, स्पर्धा कमिटी अध्यक्ष जनार्दन यादव, कॄष्णा धोत्रे, नितीन पाटील, शशिकांत मोगणे, विशाल कल्याणकर, पंच, स्कोरर व खेळाडू उपस्थितीत होते.
              विजेता संघ 
अल्केश कवाळे (कर्णधार), गिरीष पोळ, जय दाडमोडे, महेश मस्के, ओमकार मोहिते, प्रथमेश पाटील, भारत पुरोहित, राजवर्धन पाटील, श्रीराज चव्हाण, स्मित पाटील, सुरज कोंढाळकर, प्रशिक्षक बापू मोगणे व सुरज जाधव. 
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *