शहरामध्ये लॉकडाऊनच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करा: प्रशासक


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शहरात लॉकडाऊन आदेशाची कडक अंमलबजाणी करा असे आदेश क्षेत्रीय अधिकारी व भरारी पथकांना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी दिले. शहरातील लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी क्षेत्रीय अधिकारी, उप-शहर अभियंता व भरारी पथक प्रमुखांची बैठक आयोजित केली होती.
      अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी जिल्हयाबरोबरच शहरात शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक घटक सोडून इतर व्यवहार पुढील सात दिवस बंद राहणार आहेत. यावेळी मेडिकल दुकाने पुर्णवेळ सुरु राहतील. दूध व भाजीपाला सकाळी ६ ते १० व सायंकाळी ४ ते ७ यावेळेत घरपोच द्यावयाची आहेत. गॅस वितरणासाठीही सकाळी ६ त १२ या वेळेस परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर कोणतीही दुकाने सुरु ठेवण्यास, मार्केटमध्ये, रस्त्यावर भाजी विक्री करण्यास परवानगी नसल्याचे सांगितले.
       इस्टेट ऑफिसर यांनी दूध व भाजीपाला सकाळी ६ ते १० व सायंकाळी ४ ते ७ यावेळेत घरपोच द्यावयाच्या सूचना आज सकाळीच विक्रेत्यांना सूचना दिले असल्याचे सांगितले. दूध व भाजीपाला ऑर्डरप्रमाणे संबंधितांनी घरी पार्सलद्वारे पोच करावयाचे सांगितले आहे. या कालावधीत मार्केट कमिटीही बंद राहणार आहे.
       शहर अभियंता नारायण भोसले यांनी सर्व उपशहर अभियंता यांनी आज फिरती करुन या लॉकडाऊनच्या कालावधीत भाजी खरेदी करावयाची झाल्यास ऑनलाईन मागविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे महापालिकेने तयार केलेल्या ॲपवर सर्व भाजी विक्रेत्यांची नोंद केली असल्याचे सांगितले.
      प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहरातील हॉटस्पॉट कमी झाले पाहिजेत यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी दैनंदिन फिरती करुन लॉकडाऊनची अंम्मलबजावणी कडक करण्याच्या सूचना दिल्या. लॉकडाऊन हा कोरानाची साखळी तोडण्यासाठी लागू केला आहे. ज्यांच्या गाडया पोलिस जप्त करतील त्यावेळी त्याच ठिकाणी संबंधितांची ॲन्टीजन टेस्ट करण्याच्या सूचना सहा.आयुक्त संदिप घार्गे यांना दिल्या. त्याप्रमाणे ॲन्टीजन टेस्टसाठी टिम तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.
         घरपोच भाजीपाला मागवावा…..
      नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत भाजी खरेदीसाठी रस्त्यावर येऊ नये. कोणताही भाजी विक्रेता रस्त्यावर भाजी विक्रीस बसणार नाही. त्यामुळे घरपोच भाजीपाला ऑनलाईन अथवा फोन करुन मागवावा असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
      यावेळी उप-आयुक्त रविकांत अडसुळे, निखील मोरे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, बाबुराव दबडे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, पर्यावरण अभियंता अतिक्रमण प्रमुख पंडीत पोवार, सहा.वाहतूक बशीर मकानदार, पांडूरंग पाटील, राजेंद्र सुर्यवंशी एस.बी.काशिद, एस.व्ही.अंगापूरकर, एस.के.अकिवाटे आरोग्य निरिक्षक राजेंद्र पाटील, उप-मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, प्रशांत पंडत, युवराज जबडे आदी उपस्थित होते.
———————————————–
 Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *