डी.वाय.पी. अभियांत्रिकीच्या आर्या हनमरला टीसीएस कडून ७ लाखाचे पॅकेज


कोल्हापूर • प्रतिनिधी
टीसीएस हि बहुराष्ट्रीय कंपनी दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी कोडिंगची स्पर्धा “कोड विटा” या नावाने आयोजित करत असते. या स्पर्धेतूनअंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनी थेट “असोसिएट सिस्टीम इंजिनिअर” या पदावर थेट नेमणूक देते. या स्पर्धेला देशातून हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी भाग घेतात आणि आपले कोडिंग चे कौशल्य आजमावून पाहतात.
यावर्षी ५० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झालेले होते. यातून अंतिम यादी मध्ये विद्यालयाचे सात विद्यार्थी पोहचले होते. त्यामधून महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या आकाश पठाडे आणि आर्या हनमर यांची प्रत्यक्ष मुलाखतीमधून निवड झाली.
आकाश पठाडे याची ‘टीसीएस निन्जा’ आणि आर्या हनमर हिची ‘डिजिटल प्रोफाइल’ या पदासाठी निवड झाली असून त्यांना अनुक्रमे ३.३६ लाख आणि ७ लाखाचे वार्षिक पॅकेज कंपनीने देऊ केले आहे.
याबाबत माहिती देताना डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.ए. के. गुप्ता म्हणाले कि सध्याच्या कोविड महामारीच्या काळात प्रत्यक्ष वर्ग सुरु नसले तरी ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी घरातून तयारी करत आहेत. यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून तयारीसुद्धा करवून घेत आहेत. आत्तापर्यंत कॅपजेमिनी, इओसिस, पर्सिस्टंट, झोरिएंट अशा विविध नामांकित कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्हज मधून संगणक विभागाच्या २३ विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष ना. सतेज डी. पाटील, विश्वस्त आ.ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. एस.गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *