संजय घोडावत विद्यापीठाचे अकॅडमिक डीन डॉ.एम.टी.तेलसंग यांचे निधन


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठाचे अकॅडमिक डीन डॉ.एम. टी. तेलसंग (वय ६२) यांचे हृदयविकाराने निधन झाले.
     संजय घोडावत विद्यापीठाच्या मॅनेजमेंटच्यावतीने मॅनेजमेंट, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. तेलसंग यांनी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील शिक्षणतज्ञ म्हणून नावलौकिक मिळविला होता. डॉ.तेलसंग यांनी काही काळ संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले आहे. त्यांना तंत्रशिक्षण क्षेत्रातील ३५ वर्षाचा अनुभव होता. त्यांनी “आऊटकम बेस्ड एज्युकेशन” ची प्रभावी अंमलबजावणी केली होती. नॅक व एनबीए एक्स्पर्ट म्हणून ते प्रसिद्ध होते. शुद्ध , सात्विक व सुसंस्कृतपणा त्यांनी आपल्या आचार विचारांमध्ये जपला होता. सहृदयता, शिस्तप्रियता, न्यायनिष्ठ, कल्पकता ही त्यांची स्वभाववैशिष्ठे होती.
     डॉ. तेलसंग यांचे मूळगाव विजापूर. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (दि.११) सकाळी ८ वाजता उदगाव वैकुंटधाम येथे होणार आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *