सुधीरभाऊ मोरे यांच्या पुढाकाराने इस्लामपूर येथे पूरग्रस्तांना राहणे व जेवणाची सोय

• जनावरांसाठी चारा व निवाऱ्याची व्यवस्था
कोल्हापूर • प्रतिनिधी
     इस्लामपूर येथे काँग्रेसचे युवा नेते सुधीरभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी मोफत प्राथमिक आरोग्यसुविधा, अन्न-पाणी पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली आहे. तसेच जनावरांसाठी चारा, निवारा आणि जे लोक पूरक्षेत्रात अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
     राज्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून पूरपट्टयातील शेतीही पाण्याखाली गेली आहे. पुरामुळे रोगराईसुध्दा पसरली आहे. पंचगंगा, कृष्णा व वारणा नदीच्या विळख्यात लोक अडकले असून त्यांची दुरावस्था झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर येथे काँग्रेसचे युवा नेते सुधीरभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी मोफत प्राथमिक आरोग्यसुविधा, अन्न-पाणी, पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली आहे. तसेच जनावरांसाठी चारा, निवारा आणि जे लोक पूरक्षेत्रात अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुधीरभाऊ मोरे यांच्या या दातृत्वपूर्ण निर्णयाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
     सुधीरभाऊ मोरे हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी त्यांनी आपत्तीग्रस्तांना मदत करून नेहमीच मानवतेची ज्योत प्रज्वलित ठेवली आहे. बोरगाव, जुनेखेड, नवेखेड, खरातवाडी, बहे, तांबवे येथे त्यांनी स्वतः जाऊन ग्रामस्थांकडून पूरपरिस्थितीचा आढावा घेत त्यांनी मदतीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
     तसेच पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी नागरिकांनी मो.नं.९८६०२००९०४ आणि ९८६०८५०९०७ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन सुधीरभाऊ मोरे यांनी केले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *