केशवराव भोसले नाटयगृहाशेजारील अनाधिकृत केबीन व हातगाडयांवर कारवाई

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     केशवराव भोसले नाटयगृहाशेजारील खाऊ गल्लीतील अनाधिकृत लावलेल्या केबीन व हातगाडयांवर कारवाई करण्यात येत असताना २३ केबीन स्वत:हून केबीनधारकांनी काढून घेतल्या तर १५ हातगाडया महापालिकेच्यावतीने जप्त करण्यात आल्या. सदरची कारवाई १ जेसीबी, २ डंपर, ३ ट्रॅक्टर ट्रॉली व २५ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात आली.
     महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.२   छत्रपती शिवाजी मार्केट व अतिक्रमण विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली, उपशहर अभियंता नारायण भोसले, बाबूराव दबडे, इस्टेस्ट ऑफिसर सचिन जाधव, सहाय्यक अभियंता प्रमोद बराले, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, निवास पोवार, अतिक्रमण पथक प्रमुख पंडित पोवार, मुकादम, विभागीय कार्यालय व अतिक्रमण विभागाकडील कर्मचाऱ्यांनी केली

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!