• अभिनेता आर्यन हगवणेचा लक्षवेधी लूक सिनेमातून प्रेक्षकांसमोर.

Spread the love

‘खुर्ची’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित


कोल्हापूर • प्रतिनिधी
     ‘आला आला आला आला खुर्चीचा राजा आला..’ अशी टॅगलाईन म्हणत खुर्ची सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांचा भेटीस आले असून सत्तेसाठीच्या डावपेचांना मोठया पडद्यावर पाहण्यास प्रेक्षकांनाही उत्कंठा लागून राहिली आहे. या मोशन पोस्टरच्या शेवटी एक लक्षवेधी चेहरा सत्तेच्या खुर्चीत राजासारखा बसलेला असून त्याच्या हातात बंदूक पाहायला मिळत आहे, हा चेहरा म्हणजे अभिनेता आर्यन संतोष हगवणे आहे.
     आर्यन या चित्रपटात राजवीर राजाराम देसाई या नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आर्यन खुर्ची या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना आर्यन असे म्हणाला की, खुर्ची हा माझा पहिलाच चित्रपट असून मी पहिल्यांदाच भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील भूमिका साकारताना खूप मज्जा आली. बरेच काही शिकायला मिळाले.
     ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ॲक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाच्या टिझर नंतर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टर मध्ये सत्तेसाठीची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत असलेला पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, सभासदांचे प्रेम, प्रचार याचे हुबेहूब वर्णन मोशन पोस्टरमध्ये करण्यात आले आहे. 
     ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित हा चित्रपट सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर आणि अमित बैरागी  यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे.  या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष वसंत हगवणे यांची असून दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील अँड ॲक्ट प्लॅनेट यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा पेलली आहे.
      खुर्चीसाठी खेळली जाणारी लढाई खेळताना त्याचा इतरांवर आणि लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आर्यनला या खुर्ची चित्रपटात सत्तेसाठीच्या खुर्चीवर बसलेले पाहून चित्रपटात नेमके काय घडले असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!