संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते सचिन खेडेकर व अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      प्रसिद्ध उद्योगपती व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांचा ५७ वा वाढदिवस सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे येथे संपन्न होणार आहे. वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेते सचिन खेडेकर व अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. 
      दरम्यान, याचदिवशी संजय घोडावत विद्यापीठाच्या ”उमंग” या वार्षिक स्नेहसंमेलनाचेही उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 
     सचिन खेडेकर यांनी मराठी, हिंदी, तेलगू, मल्याळम, गुजराती चित्रपटामध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी “काकस्पर्श”, “मी शिवाजी राजे भोसले बोलतोय”, सिंघम, जिद्दी अशा बऱ्याच चित्रपटात उत्कृष्ट भूमिका बजावत आपल्या अभिनयाने सर्वाना मंत्रमुग्ध केले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील “हम्पी,” “पावनखिंड” या मराठी चित्रपटातून आपली उत्कृष्ट भूमिका साकारत लाखो रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या दिवशी हे दोन्ही पाहुणे आपल्या चाहत्यांशी संवाद साधणार आहेत.
      संजय घोडावत यांचा वाढदिवस व एसजीयुच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त  दरवर्षी प्रसिद्ध अभिनेता व अभिनेत्री यांना निमंत्रित केले जाते. यादिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वार्षिक स्नेहसंमेलनही उत्साहाने पार पाडले जाते.
      उद्योगपती संजय घोडावत हे अनेक परोपकारी उपक्रमांसाठी आघाडीवर आहेत. त्यांनी आजवर अंध-अपंग शाळा, अनाथालये, दुष्काळग्रस्त शेतकरी, वृद्धाश्रमे, आरोग्य केंद्रे, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय खेळाडू, गरीब गरजूंना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपले आहे. महापूर असो वा कोरोना काळ, अशा अनेक प्रसंगी त्यांनी उदार भावनेने मदत केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!