कोल्हापूर • प्रतिनिधी
इंडियन मार्शल आर्ट थांग – ता असोसिएशन कोल्हापूर संलग्न ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशनच्यावतीने नवरात्रौत्सवात ” आदिशक्तीच जागर, स्त्रीचा सन्मान ” कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. नवरात्रात विविध उपक्रम राबवले जातात. यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर संघटनेने नवरात्रात क्रांतिकारी व ऐतिहासिक महिलांचे प्रतिमा पूजन विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते केले.
नवरात्र उत्सवात महापौर सौ . निरोफर आजरेकर यांच्या हस्ते अरूणा जसफ अली यांच्या प्रतिमा पूजनाने सुरूवात झाली. त्यानंतर सौ.सरलाताई पाटील यांच्या हस्ते माजी पंतप्रधान श्रीमंती इंदिरा गांधी, पीएसआय सौ. मनीषा नारायणकर यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई, सौ .निशा भोसले यांच्या हस्ते कैप्टन लक्ष्मीनाथ सहगल, सौ. तनुजा शिपुरकर यांच्या हस्ते मादाम भिकाजी कामा, डॉ.अनघा धर्मे यांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी, श्रीमती संगीता मोरबाळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले,सौ. सुनंदा कुंभार यांच्या हस्ते पंडिता रमाबाई तर पोलिस
निरीक्षक सौ. वैष्णवी पाटील यांच्या हस्ते महाराणी ताराबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजक संघटनेचे सचिव सतीश वडणगेकर व मोहन ढवळे तसेच संघटनेचे अध्यक्ष अविनाश पाटील, प्रशिक्षक रोहित काशीद यांनी केले. यासाठी ऐश्वर्या पाटील, ऋतुजा पाटील,अक्षय शिपेकर, उमेश कुंभार, सौ.मनाली गुजर, पुनम, विजय नगरे, प्रिया घाडगे,विजया डोईफोडे, स्नेहा सरनाईक ,गौरी कांबळे, सोनी कांबळे, मेघना परीट, शुभदा जाधव इत्यादींसह प्रशिक्षक आणि खेळाडू यांचे सहकार्य लाभले.