कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर स्पोर्ट्स् असोसिएशन (केएसए) आयोजीत महाराष्ट्र राज्यस्तरीय मानांकित १० वर्षाखालील मुले व मुली यांची लॉनटेनिस स्पर्धा नुकतीच केएसएच्या साठमारी येथील टेनिस कॉम्लेक्स येथे पार पडली. या स्पर्धेत मुलांमध्ये अदिराज दुधाणे तर मुलींमध्ये श्रावी देओरे यांनी विजेतेपद मिळविले.
स्पर्धेत राज्यातील एकूण ३२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये मुंबई, पुणे, बारामती, सातारा, सांगली व कोल्हापूर येथील २४ मुले व ८ मुली होत्या. मुलांचे एकूण २३ सामने तर मुलींचे ७ सामने झाले.
मुलांमध्ये अंतिम सामना अदिराज दुधाणे (पुणे) व युगंधर शास्त्री (पुणे) यांच्यामध्ये होऊन हा सामना अदिराजने ४-१ , ४-२ सेटने जिंकला.
मुलींमध्ये श्रावी देओरे (पुणे) व हर्षा देशपांडे (पुणे) यांच्यामधील अंतिम सामना श्रावीने ४-० , ४-० सेटने जिंकला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ केएसएचे मानद सचिव माणिक मंडलिक, सहा. सचिव राजेंद्र दळवी, ऑन.फायनान्स सेक्रेटरी नंदकुमार बामणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यकारिणी सदस्य संभाजीराव पाटील – मांगोरे, दिपक घोडके, टुर्नामेंट सुपरवायझर मेहुल केनिया उपस्थित होते.