अभियंते, बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी: पालकमंत्री

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
     शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी अभियंते व बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी  दिल्या.
     अभियंते व बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा भूमि अभिलेख अधिकारी सुदाम जाधव, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, उपअभियंता रमेश मस्कर, नगर भूमापन अधिकारी किरण माने, प्राधिकरणाचे संजय चव्हाण, नगर रचना अधिकारी प्रसाद गायकवाड यांच्यासह असोसिएशनचे अजय कोराने, विजय चोपदार, अनिल घाटगे, प्रशांत काटे, सचिन चव्हाण आणि विद्यानंद बेडेकर यांच्यासह इंजिनिअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
     पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांची निर्गती तातडीने झाल्यास शहर व जिल्ह्यातील विकास कामे गतीने होतील. नगररचना, महसूल, जिल्हा भूमि अभिलेख आणि प्राधिकरणाने याबाबत समन्वय राखून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. महानगरपालिका आणि प्राधिकरणासाठी अभियंत्यांनी एका शाखा कार्यालयात परवाने काढले तरी इतर शाखा कार्यालात ते ग्राहय धरले जावेत. त्याचबरोबर यु.एल.सी. कडून ना-हरकत आवश्यक असलेल्या जागांची यादी जाहीर करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.
      जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, अभियंते व बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी प्राधान्य दिले जाईल. बांधकाम व्यवसायिकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याबाबत आवश्यक उपाययोजना केल्या जातील.
    आर्किटेक्चर, इंजिनिअर्स आणि बांधकाम व्यावसायिकांनी विविध विभागात वेगवेगळ्या नियमावलीमुळे येणाऱ्या अडचणी मांडल्या. नियमावली, रेखांकन तसेच भूमी अभिलेख आणि नगर भूमापन  विभागाशी संबंधित समस्या मांडून कामे प्रलंबित राहू नयेत यासाठी महानगरपालिका आणि प्राधिकरणासाठी अभियंत्यांना एकच परवाना मिळावा, अशी विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!