ना.सतेज पाटील यांच्या प्रयत्नांतून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सुमारे ३ कोटी  निधीस प्रशासकीय मान्यता

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१ – २२ अंतर्गत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुमारे ३ कोटी रूपयांच्या निधीस आज प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीमधून कोदे, आदमापूर, वाघापूरसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचा विकास होणार आहे.
      पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्ह्याला विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीत-जास्त निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१ – २२ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी सुमारे ३ कोटी निधीच्या कामांस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेतर्गत जिल्ह्यातील पट्टणकोडोली, अब्दुललाट, देवरवाडी, नितवडे – दोनवडे खेडगे, निढोरी , कुरणी आदि गावांतील विविध विकासात्मक कामे केली जाणार आहेत.
       हा निधी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे सहकार्य लाभले असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!