जिओ इन्स्टिट्यूटतर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रकिया सुरू

Spread the love


• डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मार्केटिंग कम्युनिकेशन्स
कोल्हापूर • प्रतिनिधी
     आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्केटिंग कम्युनिकेशन्स, डेटा सायन्स, डिजिटल मीडिया यांनी आपले आजचे जीवन व्यापून टाकायला सुरुवात केली आहे. आजच्या इंटरनेट युगाची ती गरज आहे. त्यामुळेच जसजसा त्यांचा वापर वाढणार, तसतसं या क्षेत्रातले प्रशिक्षित मनुष्यबळही लागणार. याचा विचार करून जिओ इन्स्टिट्यूटने या क्षेत्रातल्या पदव्युत्तर पूर्णवेळ शिक्षणक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. हा शिक्षणक्रम एक वर्षाचा असेल.
       जिओ इन्स्टिट्यूटतर्फे नुकतीच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याची घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशन या संस्थांनी सामाजिक दातृत्वाच्या अनुषंगाने पुढाकार घेऊन जिओ इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतले उच्च शिक्षण देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. नव्या मुंबईत असलेल्या या संस्थेकडून २०१९ पासून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत.
      ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे जिओ इन्स्टिट्यूटचे कुलपती (Chancellor) असून, डॉ. दीपक जैन हे कुलगुरू (Vice Chancellor) आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS), तसेच, डिजिटल मीडिया अँड मार्केटिंग कम्युनिकेशन्स (DM & MC) या पदव्युत्तर पूर्णवेळ  शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्यासाठी जिओ इन्स्टिट्यूटने इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत.
                     कोणासाठी उपयुक्त?…..
      AI & DS या शिक्षणक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स या विषयांची थिअरी, तसेच त्यांचा समाजातला प्रत्यक्ष वापर यांबद्दलचे शिक्षण दिले जाणार आहे. DM & MC मध्ये विद्यार्थ्यांना आजच्या डिजिटल युगात ग्राहकांना अधिकाधिक चांगला अनुभव कसा देता येईल, त्यांच्याशी चांगला संवाद कसा साधता येईल, याबद्दलचे ज्ञान मिळेल. डेटा सायंटिस्ट, AI रिसर्चर्स, इंडस्ट्रियल आणि सोशल एंटरप्रेन्युअर्स आदी बनू इच्छिणाऱ्या अर्ली करिअर प्रोफेशनल्ससाठी AI & DS हा कोर्स उत्तम ठरेल. तसेच, मार्केटिंग कम्युनिकेशन्स, ब्रँड कन्सल्टिंग, डिजिटल मार्केटिंग,, मार्केटिंग अ‍ॅनालिटिक्स, कंझ्युमर रिसर्च आदी क्षेत्रांत करिअर करू इच्छिणाऱ्या अर्ली करिअर प्रोफेशनल्ससाठी DM & MC हा कोर्स उत्तम ठरेल.
       अशी असेल पात्रता AI & DS साठी इच्छुक असलेल्यांनी कम्प्युटर सायन्स/आयटी/ मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/इकॉनॉमिक्स आदींपैकी कोणत्याही किमान एका विषयातला कोर्स अंडरग्रॅज्युएट पातळीवर पूर्ण केलेला असावा. DM & MC साठी इच्छुक असलेल्यांनी कोणत्याही क्षेत्रातली किमान तीन वर्षांची अंडरग्रॅज्युएट डिग्री घेतलेली असणे आवश्यक आहे. दोन्ही कोर्सेससाठी इच्छुकांना ग्रॅज्युएशनला किमान ५० टक्के किंवा समकक्ष CGPA असणे गरजेचे आहे. तसेच, संबंधित क्षेत्रातला किमान १८ महिन्यांचा अनुभव १ जुलै २०२२पर्यंत घेतलेला असणेही गरजेचे आहे. 
                        अर्ज कसा करायचा?…..
       या शिक्षणक्रमांना अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया तीन टप्प्यांची आहे.
https://www.jioinstitute.edu.in/ ही अधिकृत वेबसाइट आहे. या वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन Apply Now या लिंकवर क्लिक करून आवश्यक ती डॉक्युमेंट्स अपलोड करावीत. तसेच, २५०० रुपये अ‍ॅप्लिकेशन शुल्क भरावं. ही प्रक्रिया केल्यानंतर Jio Institute Entrance Test (JET) देता येईल. याला पर्याय म्हणून उमेदवार GRE Test चा स्कोअर देऊ शकतो. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना ऑनलाइन पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. अंतिम निवड उमेदवाराच्या सर्वांगीण कामगिरीचा विचार करून केली जाणार आहे. JEE Advanced 2022: विद्यार्थ्यांनो, कधी होणार परीक्षा आणि कसा करावा अर्ज; वाचा देश-विदेशातले नामवंत तज्ज्ञ या दोन्ही शिक्षणक्रमांना शिकवणार आहेत.
       गरजू व पात्र विद्यार्थ्यांना जिओ इन्स्टिट्यूटकडून ट्यूशन फीच्या १०० टक्के एवढी स्कॉलरशिपही दिली जाणार आहे, असे संस्थेकडून कळवण्यात आले आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी संस्थेची वर दिलेली वेबसाइट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
——————————————————- ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!