कृषीपंप धोरण २०२० अंतर्गत जिल्ह्यात १७७० वीजजोडण्या

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्ह्यात ‘कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२०’ अंतर्गत १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या व लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर अंतर, रोहित्रावरील भारक्षमता अशा तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या १ हजार ७७० कृषीपंपाना वीजजोडणी देण्यात आलेली आहे. वडगाव, कळे, व गडहिंग्लज उपविभागात पैसे भरल्यांनतर २४ तासात कृषी पंपास वीजजोडणी देऊन महावितरणने कृषी धोरणाच्या अंमलबजावणीत एक वेगळा ठसा उमटविला आहे. 
         २४ तासात वीजजोडणी …..
     ‘कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२०’ अंतर्गत  जयसिंगपूर विभागातील वडगाव उपविभागात विजयकुमार येवलूजे (मौजे नागाव ता.हातकणंगले) यांना पैसे भरल्यानंतर पाच तासात वीजजोडणी देण्यात आली. कोल्हापूर ग्रामीण विभाग १मधील कळे उपविभागात तुकाराम पाटील (मौजे आकुर्डे ता.पन्हाळा), गडहिंग्लज विभागात महादेव कागणिकर (मौजे चन्नेकुप्पी ता. गडहिंग्लज), संतोष दड्डी  (मौजे बड्याचीवाडी ता. गडहिंग्लज ,दोन  वीजजोडण्या) या शेतकऱ्यांना पैसे भरल्यानंतर २४ तासाच्या आत कृषीपंप वीजजोडण्या दिलेल्या आहेत.
      महावितरणकडून राज्यशासनाने जाहीर केलेल्या ‘कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२०’ च्या अंमलबजावणी सुरू आहे. या धोरणानुसार कृषीपंप वीज जोडणीसाठी  एक कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी – कर्मचारी कृषीपंप वीजजोडणी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत.

Ask your doctor or local hospital for more information. cialis Many travelers worldwide have reported unexpected flight cancellations and limited flight availability.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!