कृषिपंप ग्राहकांनी भरले ५० कोटी ९४ लक्ष रुपयांचे थकीत वीज बील


कोल्हापूर • प्रतिनिधी
       कृषीपंप धोरण २०२० अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २३ हजार ६७३ कृषीपंप ग्राहकांनी ५० कोटी ९४ लक्ष रुपये वीज बिलाच्या थकबाकीचा भरणा करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यात  कोल्हापूर जिल्ह्यात ९ कोटी ७६ लक्ष तर सांगली जिल्ह्यात ४१ कोटी १८ लक्ष रूपयांच्या थकबाकीचा भरणा करण्यात आला आहे. या धोरणाचा शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीतून मुक्त होण्यासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन  मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.        महावितरणचे  अभियंते व जनमित्र शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी धोरणाची माहिती देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १ लक्ष ४५ हजार ९०४ कृषी ग्राहकांकडे ४७७ कोटी ६६ लक्ष रुपयांची एकूण वीज बील थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे ४६ कोटी ९३ लक्ष माफ करण्यात आले आहे. तर उरलेल्या मूळ थकबाकीच्या ४३० कोटी ७२ लक्षापैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे २१५ कोटी ३६ लक्ष रक्कम माफ करण्यात येणार आहे.
      सांगली जिल्ह्यात २ लक्ष ३९ हजार २७९ कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे १२८४ कोटी १८ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे २२९ कोटी २ लाख माफ करण्यात आले आहे. तर उरलेल्या मूळ थकबाकीच्या १०५५ कोटी १६ लाखांपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे ५२७ कोटी ५८ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे.
      कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब कृषी ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे. थकबाकीदार  कृषी ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येणार आहे. योजनेत एक ते तीन वर्षासाठी सहभाग घेतल्यास त्या त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या  रक्कमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के तर तिसऱ्या वर्षात २० टक्के  माफ करण्यात येईल. ग्राहकांनी चालू वीजबिले भरणे आवश्यक राहील.
       या धोरणानुसार थकबाकीसह चालू वीजबिलांद्वारे वसुल झालेल्या एकूण रकमेपैकी ३३  टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात तर ३३ टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
      ग्रामपंचायतींना कृषीपंपाच्या वीज बिल वसुलीसाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. वसुल थकबाकीच्या ३० टक्के तर चालू वीजबिल वसुली रक्कमेच्या २० टक्के प्रोत्साहन असेल. गावपातळीवर सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला स्वयंसाह्यता गट इत्यादींची वीज देयक संकलन एजन्सी म्हणून नेमणुक करण्यात येईल. त्यांनाही प्रोत्साहन उपलब्ध असेल. शेतकरी संस्था व सहकारी साखर कारखान्यांना वसूल केलेल्या थकबाकीच्या १० टक्के रक्कम प्रोत्साहन असणार आहे.
       कृषी ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील मराठी व इंग्रजीमध्ये महावितरणने पुढील वेबपोर्टलवर https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/  उपलब्ध करून दिला आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा. 

So they target the ones that are believed to have more control over promoting sleep. cialis 20mg price in malaysia However, these selective GABA sleeping pills can have some potential side effects that are given below:.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *