अहमदनगर जिल्ह्याचा कृषी जीडीपी राज्यात नंबर वन असेल

Spread the love

• पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
अहमदनगर :
     खरीप हंगामात खते, बी-बियाणे याची कमतरता शेतकऱ्यांना जाणवणार नाही, याची दक्षता जाईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीतूनच जिल्ह्याचा जीडीपी वाढेल हे लक्षात घेवून उत्पादन वाढीसाठी एकत्रीत प्रयत्न व मार्गदर्शन कृषी विभागाने करावे. तसेच लक्षांकानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याची काळजी घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. अहमदनगर जिल्ह्याचा कृषीचा जीडीपी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नंबर वन असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
      पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी, खरीप हंगाम-२०२१ च्या अनुषंगाने प्रशासनाने पेरणीपूर्व केलेल्या नियोजनाचा दूरदृश्यप्रणाली अर्थात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
     यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. बबनराव पाचपुते, आ. संग्राम जगताप, आ. लहू कानडे, आ. आशुतोष काळे, आ. रोहीत पवार, आ. किरण लहामटे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जि. प. कृषी सभापती काशीनाथ दाते, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार, कृषि उपसंचालक विलास नलगे, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक संदीप वालावलकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जिल्हा कृषि अधिकारी सुनिल राठी, आत्मा प्रकल्प उपसंचालक अनिल गवळी आदी यामध्ये सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारीही यामध्ये सहभागी होते.
      पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना खते-बियाणांची अडचण येता कामा नये. खरीप हंगामात खते- बियाणांचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. अडचणीची संभाव्य शक्यता गृहीत धरून जिल्हास्तरासाठी ८ हजार टन युरीयाचा बफर स्टॉक करावा. पावसाळी दिवसात आदीवासी परिसरात निर्माण होणारी अडचण लक्षात घेवून नियोजन करावे. खरीप हंगामासाठी सहकारी- राष्ट्रीयकृत बँकांनी लक्षांकाप्रमाणे शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनास दिले. तसेच जिल्ह्यात आणखी स्वयंचलीत हवामान केंद्र उभारणीबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कुकडी प्रकल्पातील जिल्हयाच्या हक्काचे पाणी जिल्हयास मिळेल. त्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले.
      यावेळी सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि कृषि सहसंचालक बिराजदार यांनी जिल्ह्यातील आगामी खरीप हंगाम नियोजनाची माहिती सादर केली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने खरीप हंगाम नियोजनाची पूर्व तयारी केली.
      या बैठकीत व्हिसीद्वारे उपस्थित असणाऱ्या मंत्री गडाख व राज्यमंत्री तनपुरे यांनी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण सूचना केल्या. तसेच आ. रोहीत पवार, आ डॉ. तांबे, आ. लहामटे, आ. कानडे,आ. काळे, आ. पाचपुते यांनी आपली मते व्यक्त केली

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!