अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाचे विविध मागण्यांसाठी उपोषण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     चर्मकार समाजाच्या संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळाकडील सर्व योजना पूर्ववत चालू कराव्यात यांसह इतर मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाच्यावतीने  लाक्षणिक उपोषण करण्यात आले. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण करण्यात आले.
     दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. यावेळी अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ राज्य अध्यक्ष रघुनाथ मोरे,  जिल्हा अध्यक्ष विठ्ठल नांगरे, राज्य सल्लागार कमिटी सदस्य दामाजी रोटे, शहर अध्यक्ष रमेश टोणपे, शहर युवा अध्यक्ष दीपक खांडेकर, राज्य उपाध्यक्ष एम. के. चव्हाण,  जिल्हा उपाध्यक्ष भगवान रोटे, शहर उपाध्यक्ष अजित अंकारे, सरचिटणीस जीवन पोवार, दत्ता बामणेकर, आनंदा चव्हाण, बच्चाराम यादव, वसंत पोवार, गोकुळ कांबळे, एल.बी. नांगरे, सागर माने, रामचंद्र पोवार, वसंत पाखरे, हिंदुराव पोवार, भिकाजी जाधव, एकनाथ गडकर, महिपती माने, सागर पोवार व दिपक संकपाळ आदी उपस्थित होते.
     चर्मकार समाज सेवा संघाच्या मागण्या…..
• संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळच्या योजना पूर्ववत चालू कराव्या.
• महामंडळाकडील सर्व योजना पूर्ववत चालू कराव्यात.
• महामंडळाकडील बीज भांडवल कर्ज योजनेत वाढीव निधी मिळावा.
• एन. एफ. डी. सी. कर्ज योजना ५ ते २५ लाखापर्यंत करणे.
• वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मंजूर करण्यात यावी.
• गटई कामगार योजना महामंडळाकडे देण्यात यावी.
• कर्जमंजुरी निवड समिती रद्द करावी.
• महिला किसान योजनेमध्ये वाढीव निधी मिळाला.
• चर्मकार समाजातील कारागीर, दुकानदार, गटई कामगार यांचे कोरोना व महापुरामुळे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!