संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २८९२ रूपये

संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २८९२ रूपये
कोल्हापूर • प्रतिनिधी
     सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची पहिल्या पंधरवड्याची ऊसाची एकरकमी एफ.आर.पी.२८९२  रुपये इतकी आहे. तसेच पहिल्या पंधरवड्याची तोडणी- वाहतुकीची वाढीव दरासह बिले काढली आहेत. 
    दरम्यान, गुरुवारी बँकांचा संप व शनिवार दि.२८, रविवार दि.२९ व सोमवार दि.३० बँकांना सुट्टी असल्याने ऊस उत्पादक  शेतकऱ्यांनी गुरुवार दि.३ डिसेंबरपासून आपआपली खाती असलेल्या बँकेमध्ये संपर्क साधून बिले घेऊन जावीत, असे पत्रक कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी काढले आहे.
     सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे, अशी विनंती श्री. मुश्रीफ यानी पत्रकात केली आहे.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *