जिल्ह्यातील सर्व व्यापार सोमवारपासून सुरू: ललित गांधी

Spread the love


• आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्ट आश्‍वासन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे व्यापार सुरू करण्याच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या पुढाकाराने ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’ ने शहर व जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना व व्यापार्‍यांच्यावतीने शासनाशी केलेल्या तीव्र संघर्षाला अखेर यश मिळाले असून राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले जातील असे स्पष्ट आश्‍वासन दिल्याने,सोमवार दि. १९ जुलैपासून संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
     ५ दिवसांचा अपवाद वगळता जवळपास १०० दिवस सुरू असलेला लॉकडाऊन व्यापार्‍यांसाठी अत्यंत अडचणीचा ठरला आहे. वर्षभरात दोन वेळा प्रदीर्घ लॉकडाउनमुळे व्यापार्‍यांचे अर्थकारण तर बिघडलेच, सोबत बेरोजगारीची समस्यासुध्दा वाढू लागली आहे. दिवसेंदिवस बिघडत जाणार्‍या परिस्थितीमुळे व्यापार्‍यांचा संयम संपला होता, वारंवार विनंत्या व मागणी करूनही सरकारकडून अपेक्षित निर्णय मिळत नसल्याने व्यापार्‍यांनी संघर्षाची भूमिका घेतली. शुक्रवारपासून व्यापार सुरू करण्याचा इशारा ललित गांधी यांनी दिला होता व त्यासाठी शुक्रवारी सकाळी १० वाजता जाहीर सभा बोलविण्यात आली होती. तत्पूर्वी, ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले व व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. व्यापार्‍यांच्या अडचणी समजावून घेऊन नाम. राजेश टोपे यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करण्यास अनुकुलता दाखवली व अधिकार्‍यांना तसा प्रस्ताव देण्याच्या सुचना दिल्या.
     जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी प्रशासनाच्यावतीने भूमिका मांडताना व्यापार्‍यांची मागणी योग्य असल्याचे प्रतिपादन केले.
     यावेळी शिष्टमंडळात प्रशांत पोकळे, माणिक पाटील-चुयेकर, सतिश माने, अनिल पिंजाणी, शाम बासराणी, जयंत गोयाणी, किरण नकाते, मनोज बहिरशेठ, दिपक पुरोहित, प्रताप पोवार, दर्शन गांधी आदींचा समावेश होता.
      आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीनंतर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी राजारामपुरी येथील जनता बझार चौकात  सभेमध्ये मोठ्या संख्येने जमलेल्या व्यापार्‍यांना माहिती दिली व सर्वांनी एकमताने सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला.
     सभेचा समारोप करताना ललित गांधी यांनी या लढ्यामध्ये साथ दिलेल्या सर्व व्यापारी व संघटनांचे, तसेच हा निर्णय होण्यामागे सहकार्य केलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व मंत्री जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, राज्य सरकार विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांना धन्यवाद दिले.
——————————————————-
 Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!