शहरातील भाजी मंडई बॅराकेटींग लावून बंद

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरातील भाजी मंडईत महापालिकेच्यावतीने बॅराकेट लावून बंद करण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारपासून भाजी मंडई बंद केल्या आहेत. विक्रेत्यांना घरोघरी फिरुन विक्री करण्याच्या सूचना केल्या आहेत.
      प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या आदेशाच्या पालनासाठी उप-आयुक्त रविकांत आडसूळ व उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी गुरुवारी सकाळी ७ वाजता कसबा बावडा भाजी मार्केट, धैर्यप्रसाद चौक, खानविलकर पेट्रोल पंप चौक येथील मार्केटमध्ये फिरती केली. तसेच उप-आयुक्त शिल्पा दरेकर व उपशहर अभियंता नारायण भोसले यांनी कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी भाजी मार्केट, पाडळकर मार्केट, ऋणमुक्तेश्वर मार्केट, पंचगंगा घाट भाजी मार्केट, जवाहरनगर येथील मार्केटची पाहणी केली. सहा.आयुक्त विनायक औंधकर व उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांनी शाहूपुरी भाजी मार्केट, नार्वेकर मार्केट, शेंडापार्क मार्केट येथील पाहणी केली. उपशहर अभियंता एन. एस. पाटील यांनी टिंबर मार्केट, रामानंदरनगर पुलाजवळील मंडई, रंकाळा येथील डी मार्ट, नाना पाटीलनगर चौक, सानेगुरुजी वसाहत, रायगड कॉलनी येथे मार्केटमध्ये फिरती केली. भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते पुन्हा येथे बसणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधितांना दिले. नार्वेकर मार्केट, शाहुपूरी भाजी मार्केटसह इतर मार्केटमध्ये आवश्यकतेनुसार बॅराकेटींग करण्यात आले.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!