कोरोनामध्ये पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी व संरक्षणाकरीता चाईल्ड हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शहरतील कोवीड-१९ या संसर्गामुळे अथवा इतर कोणत्याही कारणांमुळे आई आणि वडील अशा पालकांचे निधन झाल्यास त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आलेला आहे.
      कोरोनामुळे मयत झालेल्या पालकांच्या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने सदर बालके ही शोषणास बळी पडण्याची शक्यता आहे. तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यामध्ये हे बालक ओढले जाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर अशा बालकांना मदत करण्यासाठी शासनाने चाईल्ड हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. या हेल्पलाईन नंबरवर बालकांची माहिती वेळेत प्राप्त झाल्यास त्यांच्या काळजी व संरक्षणासंबंधी पुढील कार्यवाही करता येणे शक्य होणार आहे.
      यासाठी चाईल्ड हेल्पालाईन नंबर १०९८ तसेच आयुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे (८३०८९९२२२२/७४०००१५५१८), जिल्हा महिला व बाल विकास  अधिकारी (०२३१-२६६१७८८/७३८७०७७६७३), अध्यक्ष बालकल्याण समिती कोल्हापूर (०२३१-२६२१४१६/९८६०३५६६९५), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (९९२३०६८१३५), संस्था बाहय संरक्षण अधिकारी (९६०४८२३००८) इत्यादी हेल्पलाईन क्रमाकांवर संपर्क करावा.
     सदरची माहिती सर्व खाजगी कोवीड रुग्णालय, महापालिका मुख्य इमारत, चारही विभागीय कार्यालये, सर्व नागरी सुविधा केंद्रे व ११ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *