मेन राजाराम हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा “एक हात मदतीचा” उपक्रम

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     मेन राजाराम हायस्कूल १९९४ टेक्नीकल बॅचच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.३) “एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गरीब गरजू व निराधार लोकांना धान्यकीट वाटप केले.
     “एक हात मदतीचा” या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, म्हाळुंगे तर्फ बोरगाव, शिंदेवाडी, पडळ, माजगाव, कसबा ठाणे, देवठाणे, पुशिरे तर्फ बोरगाव या खेडोपाड्यात जाऊन गरीब गरजू व निराधार लोकांना धान्यकीट वाटप केले. तांदूळ, गहू, डाळ, साखर, चटणी पाकीट, गोडेतेल, साबण, निरमा, कोलगेट, चहापूड, खोबरेल तेल, बिस्किट पुडे अशा साहित्याचे वाटप केले.
      यावेळी मेन राजाराम हायस्कूल १९९४ टेक्निकल बॅचचे विद्यार्थी सचिन उरूणकर, अजय लुगडे, दीपक खांडेकर, अनंत माळी, शिवप्रसाद स्वामी, सचिन कांबळे, अमोल यादव, श्रीधर शिंदे, रूपाली खाडे, सुशांत सावंत, सुशील कराडे, विशाल पाटील, सुहास चिप्रे, विशाल पाटील, अनिल भादवण, विजय रजपूत, बाळासो पाटील, बालाजी पाटील, संजीत गाताडे उपस्थित होते.
     यासाठी पडळ सर्कल अधिकारी अजय लुगडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष पोपटराव निकम, कोतवाल प्रकाश कांबळे, पोलीस पाटील अभिनंदन पवार, पुशिरे तर्फ बोरगावचे माजी सरपंच सुभाष कुंभार, महाडीकवाडीचे सामाजिक कार्यकर्ते भाऊ जांबिलकर, शिंदेवाडीच्या सरपंच श्रीमती सिंधुताई शिंदे, इंद्रजित शिंदे आदींची उपस्थिती व सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!