कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या काळात कोल्हापुरात कोरोनामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले. त्यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते. स्मशानभूमीत अविरतपणे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सेंट झेवियर्स हायस्कूलमधील इयत्ता दहावी १९७७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी ५० हायजेनिक किट देण्यासाठी महापालिका प्रशासक सौ. कांदबरी बलकवडे यांच्या कडे देण्यात आले तसेच कोरोना काळात चांगले कार्य केल्याबद्दल प्रशासकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीसह कदमवाडी, बापट कॅम्प व कसबा बावडा येथील स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना हे हायजेनिक किट प्रदान करण्यात आले. या हायजेनिक किटमध्ये दोन टॉवेल्स, दोन नॅपकिन्स, एक ब्लँकेट, निरमा वॉशिंग सोप, तीन बोटल, सॕव्हलोन साबण,सॕव्हलोन लोशनचा समावेश आहे.
यावेळी सौ. पंकज पवार, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. दिनेश शेटे, ॲड. नरेंद्र गांधी, डॉ. सुशील पवार, महापालिका आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, निखिल मोरे नेत्रदिप सरनोबत आदी उपस्थित होते.