गोकुळच्या कृत्रिम रेतन सेवकांच्या नेहमी पाठीशी: चेअरमन विश्वास पाटील

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     गोकुळ दूध संघाच्या पशुसंवर्धन विभागातील कृत्रिम रेतन सेवा हा मुख्य भाग आहे. तसेच १९७८ पासून संघामार्फत प्रशिक्षण देवून कृत्रिम रेतन सेवा सुरु केली आहे. ४०६ कृत्रिम रेतन सेवक संघासाठी काम करत आहेत. कृत्रिम रेतन सेवकांनी संपात सहभागी न होता आपली सेवा चालू ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या व कृत्रिम रेतन सेवकांना संघाचे ओळखपत्र, संघाचा लोगो असलेली बँग व जे प्राथमिक उपचारासाठी लागणारी औषधे काही प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले.
     कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संलग्न कृत्रिम रेतन सेवकांची आढावा मिटिंग संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात पार पडली. यावेळी चेअरमन विश्वास पाटील बोलत होते.
     पशुसंवर्धनासाठी कृत्रिम रेतन सेवा व प्रथमोपचार काम करणाऱ्या पशुधन पर्यवक्षक विरोधात शासन कारवाईमुळे पशुधन पर्यवक्षक संपावर गेले. त्यामुळे या संपाचा परिणाम जनावरांच्या उपचार सुविधांवर झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गोकुळने पुढाकार घ्यावा, अशी मागणी गोकुळ संलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्यावतीने करण्यात आली. त्याचबरोबर गोकुळ संलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्या मानधनात वाढ करावी, रेतन सेवकांची आरोग्य विमा पॉलिसी संघाने करावी व संघाचे ओळखपत्र द्यावे, अशा मागण्या यावेळी सर्व कृत्रिम रेतन सेवकांच्यावतीने मिटिंगमध्ये करण्यात आल्या.
     संचालक अंबरीश घाटगे यांनी बोलताना कृत्रिम रेतन सेवकांचे कोरोना काळातील काम कौतुकास्पद आहे व त्यांच्या मागणीचा विचार संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये सकारात्मक करण्यात येईल, असे सांगितले.
    यावेळी कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर यांनी गोकुळ संलग्न कृत्रिम रेतन सेवकांच्या पाठीशी राहील, असे मनोगत व्यक्त केले.
     स्वागत व प्रास्ताविक डॉ. यु. व्ही. मोगले यांनी व आभार डॉ. ए. व्ही. जोशी यांनी मानले.
     यावेळी संचालक शशिकांत पाटील – चुयेकर, बाबासाहेब चौगले, कर्णसिंह  गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, डॉ.दळवी, डॉ. किटे, डॉ.गायकवाड आदि उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!