श्री अंबाबाई मंदिर दर्शन वेळेत वाढ


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील  श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी – अंबाबाई ,केदारलिंग (जोतिबा), ओढ्यवरील सिध्दीविनायक मंदिर, दत्त भिक्षालिंग मंदिरांसह तीनहजार बेचाळीस मंदिरातील दर्शन वेळेत वाढ करण्याचा निर्णय सोमवारी देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
     देवस्थान समितीकडील मंदिरांमध्ये दर्शनाची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ होती, ती आता सकाळी ७ ते दुपारी १२ तर सायंकाळी ४ ते ७  करण्यात आली आहे. तसेच दर्शन आता ई पासद्वारे घेता येणार असून यासाठी देवस्थान समितीचे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. यासाठी देवस्थान समितीमार्फत दि. २४ नोव्हेंबरपासून मोफत ई- पासची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थान समितीने दिलेल्या www.mahalaxmikolhapur.com या लिंकच्यामार्फत गेट ई – पास तयार करून घ्यावेत. फॉर्म भरल्यानंतर ई पास तयार होईल. या भक्तांसाठी वेगळी रांग करण्यात येणार असून ही सुविधा संपूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. 
     यावेळी सदस्य शिवाजीराव जाधव,राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, अभियंता देशपांडे उपस्थित होते.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *