गोकुळ प्रकल्प येथे अमृत कलश पूजन


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     कोल्‍हापूर जिल्‍हा स‍हकारी दूध उत्‍पादक संघाच्या गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प याठिकाणी राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री  हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृह राज्यमंत्री  सतेज पाटील यांच्या हस्ते अमृत कलश पूजनाचा कार्यक्रम झाला.
      सोमवारी (दि.७) सकाळी ११ वाजता झालेल्या या अमृत कलश पूजन कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आरोग्य राज्यमंत्री राजेन्द्र पाटील–यड्रावकर, गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी), खासदार संजय मंडलिक, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, आ. राजू आवळे, माजी आ. के.पी. पाटील, माजी आ. चंद्रदीप नरके, माजी आ. संध्यादेवी कुपेकर, गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, जि.प. सदस्य युवराज पाटील, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आ. सुजित मिणचेकर व संघाचे संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *