अमृत नरकेची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      मेंगलोर, कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबीरासाठी शिवाजी विद्यापीठ संघात अमृत उत्तम नरके याची निवड झाली आहे. तो कसबा बावडा येथील डॉ. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी विद्यार्थी आहे.
      राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. देशातील वेगवेगळ्या विद्यापीठामधील राष्ट्रीय सेवा योजनामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विचारांची आणि संस्कृतीची आदान प्रदान व्हावी, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी हे एक आठवड्याचे शिबिर होत आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा संघ सहभागी होत आहे.
      अमृत नरके याला शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.अभय जायभये यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच  संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, उपाध्यक्ष ना.सतेज पाटील, विश्वस्त आ.ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डॉ.ए.ए.राठोड, डॉ.प्रमोद चौगले, डॉ. राजेंद्र रायकर यांचे प्रोत्साहन लाभले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!