…..आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ झाले नतमस्तक    

Spread the love

      
  मुंबई : 
       मुंबईतील पन्हाळा लॉज अर्थातच छत्रपतींचा राजवाडा येथेच ६ मे १९२२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची प्राणज्योत मालवली. आजही हा वाडा छत्रपतींचा राजवाडा म्हणूनच ओळखला जातो. उद्या शुक्रवार दि. ६ मे २०२२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शताब्दी पुण्यतिथी. त्यानिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या पवित्र स्थळाला भेट देऊन नतमस्तक झाले.
      यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
       वाड्याच्या प्रवेशद्वारावरच ताम्रपटामध्ये लिहिले आहे, “पन्हाळा लॉज, छत्रपतींचा राजवाडा, राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी याच ठिकाणी निधन झाले होते. त्यांचे शेवटचे बोल होते. “मी जाण्यास तयार आहे. डर कुछ नही। सबको सलाम बोलो!”
      राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे हे शेवटचे बोलसुद्धा त्यांच्या धीरोदात्तपणाचीच प्रचिती देतात. साक्षात मृत्यूलासुद्धा कवटाळताना ते एखाद्या ऋषीप्रमाणे स्थितप्रज्ञ होते, याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. त्यामुळेच राजा आणि ऋषी असा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. म्हणूनच ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर सबंध देशातील एकमेव राजर्षी ठरले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!