संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धेत अनिश गांधी अजिंक्य

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने संजय घोडावत पॉलिटेक्निकने संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या एकदिवसीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या अनिश गांधीने आठपैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले. त्याला रोख ७ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.   
      अहमदनगरच्या अखिलेश नागरेने सात गुणांसह व सरस टायब्रेकर गुण आधारे उपविजेतेपद मिळविले त्याला रोख ५ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.
सात गुण करणाऱ्या मिरजेच्या अभिषेक पाटीलला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रोख ३ हजार रुपये व चषक देऊन गौरविले. अनिकेत बापट (सातारा) व तुषार शर्मा (कोल्हापूर) यांचा अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक आला.
       स्पर्धेचा बक्षीस समारंभ घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात झाला. यावेळी पॉलिटेक्निकचे प्राचार्य व्ही.व्ही.गिरी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, प्रा.वंदना शहा, स्पर्धा समन्वयक व राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा.संदीप पाटील व प्रशिक्षक उत्कृष्ट लोमटे उपस्थित होते.
      संजय घोडावत, सौ नीता घोडावत, श्रेणिक घोडावत, सौ. सलोनी घोडावत व विनायक भोसले यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन सर्व बुद्धिबळपटूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी एकूण ५१ हजार रुपयांची रोख बक्षिसे व चषक आणि मेडल्स अशी एकूण ५६ बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यापैकी खुल्या गटात २१ बक्षिसे व उत्तेजनार्थ विविध वयोगटात ३५ बक्षिसे होती.
      खुल्या गटातील क्रमांक ६ ते २१ चे बक्षिस विजेते: ६) श्रीराज भोसले, रेंदाळ, ७) रविंद्र निकम, इचलकरंजी, ८) सोहम खासबारदार, कोल्हापूर, ९) प्रणव पाटील, कोल्हापूर, १०) मुद्दसर पटेल, मिरज, ११) प्रथमेश लोटके, इचलकरंजी, १२)  प्रवीण सावर्डेकर,चिपळूण, १३) संतोष सारीकर, इस्लामपूर, १४) मिलिंद नांदले, फलटण, १५) श्रेयस घोडके, इचलकरंजी, १६) सचिन मोहिते, सातारा, १७) राकेश पवार, मुंबई, १८) संदीप माने, सांगली, १९) चिंतामणी करजगी, चंदगड, २०) साद बारस्कर, कोल्हापूर, २१) हित बलदवा, जयसिंगपूर.
       विश्वस्त व्ही.व्ही भोसले, प्राचार्य व्ही. व्ही. गिरी, स्पर्धा समन्वयक प्रा.एस. एन. पाटील व सहकारी प्रा.धीरज पाटील, प्रा. एस. व्ही. चव्हाण, प्रा.आर. एस. कट्टी, प्रा.सी. एफ. राजेमहाडिक, प्रा.व्ही.एस.पावटे, विद्यार्थी समन्वयक वैष्णवी पाटील, केदार दिंडे, तेजस माळी व वैष्णवी सातपुते व सर्व कर्मचारी या सर्वांनी स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!